
बीड, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचे आणि मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाच्या खासदार रजनी पाटील यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार रजनी पाटील, माजी मंत्री आणि सहमत यांनी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे भेट दिली.डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी मुंडे कुटुंब याचे सन्मान करून सविस्तर माहिती घेतली.
या प्रकरणांमध्ये आरोपी विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या अधिवेशनात हा प्रश्न आपण उपस्थित करणार असून मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन खासदार पाटील यांनी दिले आहे
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis