रायगड- आदर्श पतसंस्थेचा स्वतंत्र गोल्ड विभाग कार्यान्वित
रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)रायगड जिल्ह्यात सातत्याने नाव कमावणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आता ग्राहक सेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे. संस्थेने आपला स्वतंत्र ‘आदर्श गोल्ड विभाग’ सुरू केला असून, येथे सोने तारणावर कमी व पारदर्शक व्याजदराने कर्ज
“सहकारी, नाही सावकारी” – आदर्श पतसंस्थेचा स्वतंत्र गोल्ड विभाग कार्यान्वित


रायगड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)रायगड जिल्ह्यात सातत्याने नाव कमावणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आता ग्राहक सेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे. संस्थेने आपला स्वतंत्र ‘आदर्श गोल्ड विभाग’ सुरू केला असून, येथे सोने तारणावर कमी व पारदर्शक व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

हा विभाग नागडोंगरी, टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळ, अलिबाग येथे सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत आदर्श पतसंस्था आपल्या शाखांमधून सोने तारण कर्ज पुरवत होती; मात्र वाढत्या मागणीचा विचार करून स्वतंत्र गोल्ड विभाग उभारला आहे. हा उपक्रम सुरू करणारी आदर्श पतसंस्था रायगड जिल्ह्यातील पहिली सहकारी पतसंस्था ठरली आहे.

उद्घाटन समारंभ रायगड जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मा. प्रमोद जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजीत पाटील, संचालक सतिश प्रधान, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल, अ‍ॅड. रेश्मा पाटील, अ‍ॅड. वर्षा शेठ, सल्लागार नितीन वाणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद जगताप म्हणाले, “आदर्श पतसंस्थेने ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने काम करत सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.”

खासगी वित्तीय कंपन्या व एनबीएफसी संस्थांकडून जास्त व्याजदर आणि लपविलेल्या शुल्कांमुळे ग्राहक त्रस्त असतात. मात्र आदर्श पतसंस्था पारदर्शक नियमावलीनुसार काम करते. “आमच्याकडे गोल्ड लोनवर स्थिर व न्याय्य व्याजदर आकारले जातात; कोणतेही लपविलेले शुल्क नाही,” असे संस्थापक सुरेश पाटील यांनी सांगितले. या उपक्रमामुळे अलिबाग तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह गोल्ड लोनची सुविधा एका छताखाली उपलब्ध झाली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande