
गडचिरोली., 28 ऑक्टोबर (हिं.स.)
शासकीय विश्राम गृह आरमोरी येथे तालुका संघटना आरमोरी यांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली. नगर परिषद, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात जातीय मतदानच्या गणणे नुसार नामाप्र, सर्वसाधारण जागेवर उमेदवार उभे करणार असे एक मताने आजच्या सभे मध्ये वज्र मूठ बांधण्यात आली.
या समाजातील जास्तीत जास्त प्रतिनिधीना निवडून आणण्यासाठी समाज बांधवाना आवाहन करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भाग्यवान मेश्राम,तालुका अध्यक्ष सुरेश खेडकर,जिल्हा सल्लागार श्री. बाबुराव शेंडे, राजेंद्र मेश्राम, जिल्हा महिला आघाडी सौ. दुमाने, सौ. मिनाक्षी गेडाम सौ. उज्ज्वला मेश्राम देलोडा, सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास डोंगरवार, देवानंद दुमाने, देविदास दुमाने, नानाजी दुमाने, संदिप गुडीमेश्राम, निखिल दिघोरे, रमेश ठाकरे,सिताराम गेडाम, राजेंद्र कोल्हे,शिवनी, शंकर नागापुरे,मोहन दुमाने, मोरेश्वर मेश्राम,नथ्थूजी पोईनकर, मंगेश खेडकर,अजय खेडकर, श्रीराम ठाकरे,सुदाम कांबळे,छबिल ठाकरे,गोपाल मेश्राम वासाळा,व बरेच समाज बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond