
लातूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) कोकण पुत्र ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखददायी आहे. वस्त्रहरण, वन रूम किचन यासारख्या नाटकांमधून संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन त्यांनी केले.अशा शब्दात राज्याचे सहकार मंत्री तथा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोक संदेशात मंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात, मालवणी भाषेची उंची गाठून ठेवण्याचं काम गवाणकर यांनी केलं. त्यांनी अनेक बोलींची नाटके केली. पु ल देशपांडे यांनी सुद्धा गवाणकर यांच्या वस्त्रहरण नाटकाची भरभरून प्रशंसा केली होती. गवाणकर यांच्या निधनाने नाटक विश्वात पोकळी निर्माण झाली आहे आणि सोबतच मालवणचा आवाजही हरपला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis