श्रीराम सुपरच्या नवीन बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांना मिळाले विक्रमी उत्पादन
धुळे, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात गहू लागवडीमध्ये श्रीराम फार्म सॉल्युशन्सने विकसित केलेल्या ‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ आणि ‘श्रीराम सुपर १-एसआर-१४’ या गहू बियाण्यांनी उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे. या सुधारित जाती उच्च उत्पादन, रोगप्रतिकारक
धुळे


धुळे, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात गहू लागवडीमध्ये श्रीराम फार्म सॉल्युशन्सने विकसित केलेल्या ‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ आणि ‘श्रीराम सुपर १-एसआर-१४’ या गहू बियाण्यांनी उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे. या सुधारित जाती उच्च उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता आणि विविध हवामान परिस्थितींमध्ये जुळवून घेण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध झाल्या आहेत.

श्रीराम फार्म सॉल्युशन्सच्या जागतिक दर्जाच्या गहू वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या या जाती — श्रीराम सुपर १-एसआर-१४ आणि ५-एसआर-०५ — त्यांच्या उत्कृष्ट उत्पादकता आणि अनुकूलन क्षमतेमुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत. या जातींमध्ये अधिक कल्ले, लांब बाळ्या आणि रोगांविरुद्ध सहनशीलता आहे. विशेष म्हणजे, बदलत्या हवामान आणि नव्या आव्हानांमध्येही या जाती उत्तम परिणाम देतात. त्यामुळे भारतातील विविध भागांतील शेतकऱ्यांची ही दोन्ही जाती पहिली पसंती बनल्या आहेत.

अनुभवी शेतकरी विपुल वसंतराव देशमुख सांगतात की यावर्षी त्यांनी आपल्या शेतात श्रीराम सुपर ५-एसआर-०५ गहू पेरला. त्यांचे म्हणणे आहे की या जातीचा खोड मजबूत असल्याने पिके पडण्याची शक्यता राहत नाही. त्याचबरोबर कल्ल्यांची संख्या जास्त असून प्रत्येक ओंबीत ८५ ते ९० दाणे मिळाल्याने उत्पादन अत्यंत चांगले आले. ते म्हणतात, “विपरीत हवामानातही श्रीराम सुपर ५-एसआर-०५ ने स्थिर आणि उत्कृष्ट उत्पादन दिले हा खरोखरच विश्वासार्ह गहू प्रकार आहे.”

त्याचप्रमाणे श्रीराम सुपर १-एसआर-१४ या जातीबद्दलही शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. शेतकरी मंगेश कुमार सांगतात की गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात श्रीराम सुपर १-एसआर-१४ बियाणे पेरले होते. त्यांच्या माहितीनुसार, या जातीच्या ओंब्या अधिक लांब आहेत, कल्ले जास्त येतात आणि प्रति बाळी दाण्यांची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय या जातीला पाणीही तुलनेने कमी लागते. मंगेश कुमार इतर शेतकऱ्यांनाही ही जात पेरण्याचा सल्ला देतात.

श्रीराम सुपर ५-एसआर-०५ आणि १-एसआर-१४ व्यतिरिक्त श्रीराम फार्म सॉल्युशन्सच्या इतर जाती जसे की श्रीराम सुपर ३-एसआर-७२, ३०३, १११ आणि २७२ ह्याही मागील काही वर्षांपासून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.

श्रीराम फार्म सॉल्युशन्स ही १३५ वर्षे जुनी डीसीएम श्रीराम लिमिटेड कंपनीचा एक भाग आहे. हा एक अग्रगण्य व्यावसायिक समूह आहे, ज्याचा वार्षिक उलाढाल १२,७४१ कोटी रुपये आहे. श्रीराम फार्म सॉल्युशन्स बीज, विशेष पोषण आणि पिक संरक्षण यांसारख्या कृषी इनपुट क्षेत्रात कार्यरत असून भारतातील कृषीला बळकटी देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande