
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीची प्रगती होण्यासाठी समाज बांधवांनी शिक्षण, सामाजिक समानता आणि आर्थिक विकास यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन आ प्रताप अडसड यांनी केले येथील माहेश्वरी भवन येथे क्षत्रिय मराठा कलार समाजाचे महासंमेलन व युवक -युवती परिचय मेळावा घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी भगवान डोहळे,प्रमुख अतिथी नामदेव जमईवार,राजेश चवरे,पालकचंद सेवईवार, दिलीप सुर्यवंशी,नरेंद्र धुवारे यांची उपस्थिती होती मेळाव्यात तीनशे युवक - युवतीने आपला परिचर दिला जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी समाजाचे माधव शेंडे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा तसेच समाजातील प्रतिभावंताचा गौरव आ प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले कार्यक्रमाला विदर्भातील मान्यवरानी हजेरी लावली होती संयोजक विनोद धूवे व माधव शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कलार समाजाचे पहिले कावलीत होणार भवन विदर्भातील संपूर्ण कलार समाज हा भाजपच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे नगरसेवक ते वरिष्ठ पदापर्यंत भाजपातून कार्यकर्ते घडले आहे या समाजाचे मतदार संघात पहिले समाज भवन कावली येथे होणार असल्याचे आ प्रताप अडसड यांनी घोषित केले. समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी