काँग्रेसच्या परभणी ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्षपदी बाबाजानी दुर्राणी यांची नियुक्ती
परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी बाबाजानी दुर्राणी यांना नियुक्तीपत
काँग्रेसच्या परभणी ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची नियुक्ती


परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी बाबाजानी दुर्राणी यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. ही नियुक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

या नियुक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन ही नियुक्ती वेळेत करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत गोंधळ कायम होता. माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

या पदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती, त्यात माजी खासदार तुकाराम रेंगे यांचाही समावेश होता. शेवटच्या टप्प्यात दुर्राणी आणि रेंगे यांच्यात तिढा निर्माण झाला होता. तथापि, पक्षाच्या उच्च नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने बाबाजानी दुर्राणी यांच्यावर विश्वास ठेवत प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande