नव तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे- हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगरात तरुण उद्योजक अधिकाधिक काम करीत आहेत याचा निश्चितच आनंद आहे, नव तरुणांनी उद्योग व्यवसाय उभा करून अधिकाधिक संपन्न व्हावे असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले आहे छत्रपती सं
राज्यपाल


छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगरात तरुण उद्योजक अधिकाधिक काम करीत आहेत याचा निश्चितच आनंद आहे,

नव तरुणांनी उद्योग व्यवसाय उभा करून अधिकाधिक संपन्न व्हावे असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण याप्रसंगी उपस्थित होत्या.

जाधववाडी सिग्नल, टी.व्ही.सेंटर येथे ‘सत्कार प्युअर व्हेज रेस्टॉरंट’चा भव्य उद्घाटन सोहळा राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी तरुण उद्योजक श्री.सार्थक वाघ याला हॉटेल व्यवसायाच्या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..

यावेळी आमदार संजय केणेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाठ, माजी उपमहापौर .विजय औताडे तसेच नागरिक उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande