सोलापुरात रक्तघटकाचा प्रचंड तुटवडा; रक्तदान करण्याचे डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून आवाहन
सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय संस्कृतीमधील सर्वांत मोठा सण दिपावलीच्या सुट्ट्या सध्या सुरू आहेत. त्यातच नोकदार, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी दिवाळी सणामध्ये व्यस्त असल्याने स्वेच्छेने रक्तदान करणारे तसेच रक्तदान शिबीरे यामध्ये घट झाली आहे. त्य
सोलापुरात रक्तघटकाचा प्रचंड तुटवडा; रक्तदान करण्याचे डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून आवाहन


सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय संस्कृतीमधील सर्वांत मोठा सण दिपावलीच्या सुट्ट्या सध्या सुरू आहेत. त्यातच नोकदार, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी दिवाळी सणामध्ये व्यस्त असल्याने स्वेच्छेने रक्तदान करणारे तसेच रक्तदान शिबीरे यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रक्तपेढ्या व रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहेत. थॅलेसेमियाग्रस्त बालके,डायलिसीस आणि कर्करोग ग्रस्त रूग्ण, गर्भवती महिला व ऑपरेशनसाठी आलेले रूग्ण यांना रक्त व रक्त घटकाची नियमित गरज असते. त्याचबरोबर डेंगी सदृश्य आजाराचे वाढते रूग्ण यामुळे रक्ताची मागणी वाढलेली आहे. अशा परिस्थितीत एैच्छिक रक्तदात्यांनी पुढे येवून रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली असताना डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संचालकांनी बैठक घेवून याबाबचा विचार करून सोलापूर शहर जिल्ह्यातील रक्तदाते, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांना रक्तदान करण्याचे आवाहन हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष सतीश मालू आणि संचालक गिरीष दर्बी यांनी केले आहे.

सध्या रक्तपेढीमध्ये एक किंवा दोन दिवस पुरेल इतकेच रक्त शिल्लक आहे. मागणी वाढली परंतु रक्ताचा पुरवठा कमी होत आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने गुडघा, यकृृत, ह्दय प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असते सुट्ट्यामध्ये असे शस्त्रक्रिया नियोजित केले असल्याने रक्ताची गरज अचानकपणे वाढते परंतु सुट्ट्यामध्ये रक्तदाते उपलब्ध होत नसतात आणि रक्तदान शिबीरेही होत नसतात अशा वेळी रक्ताचा पुरवठा होत नाही आणि रक्त तुटवडा निर्माण होतो. अशीच परिस्थितीत दिवाळीत आलेली आहे. सोलापूरमध्ये हॉस्पिटलची संख्या वाढलेली आहे. सोलापूर हे मेडिकल हब झालेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande