बीड - लंपीने मृत जनावरांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी
बीड, 28 ऑक्टोबर,(हिं.स.)। गेवराई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात लंपी आजाराने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले असून दररोज शेतकऱ्यांच्या लेकरासारख्या जपलेल्या गाई, बैल, वासरांचे मृत्यू होत आहेत. शासनाने 2023-24 मध्ये लंपी आजाराच्या प्रादुर्भावावेळी त
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेंद्र मोटे


बीड, 28 ऑक्टोबर,(हिं.स.)। गेवराई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात लंपी आजाराने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले असून दररोज शेतकऱ्यांच्या लेकरासारख्या जपलेल्या गाई, बैल, वासरांचे मृत्यू होत आहेत. शासनाने 2023-24 मध्ये लंपी आजाराच्या प्रादुर्भावावेळी तत्काळ लसीकरण मोहीम राबवून आणि मृत जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देऊन निवडणूक असल्याने दिलासा दिला होता.

मात्र यावर्षी परिस्थिती अधिक भयावह असून, मृत जनावरांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेंद्र मोटे यांनी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त कदम यांची भेट घेऊन निवडणूक नसली तरी गोरक्षा हेतू ठेऊन तरी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande