पुण्यातील जैन ट्रस्ट जमीन व्यवहाराविरोधात नांदगावात जैन समाजाचा मोर्चा
नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे येथील जैन ट्रस्टच्या मालकीच्या तीन एकर जमीन व्यवहार विरोधात नांदगाव येथील श्री खंडेलवाल दिंगबर जैन पंचायत तर्फे मोर्चा काढण्यात आला यावेळी नायब तहसिलदार कु-हे यांना निवेदन देण्यात आले. सोमवारी सकाळी दहा वाजता महाव
जैन समाजाचा नांदगावला मोर्चा


नाशिक, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे येथील जैन ट्रस्टच्या मालकीच्या तीन एकर जमीन व्यवहार विरोधात नांदगाव येथील श्री खंडेलवाल दिंगबर जैन पंचायत तर्फे मोर्चा काढण्यात आला यावेळी नायब तहसिलदार कु-हे यांना निवेदन देण्यात आले.

सोमवारी सकाळी दहा वाजता महावीर मार्ग येथील जैन मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली.शनीमंदिर, आहिल्यादेवी होळकर उद्यान, हुतात्मा चौक मार्गाने जुन्या तहसील कार्यालयातील पोलीस ठाण्यात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले..याप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ जयकुमार कासलीवाल, सुजाता बडजाते, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, दत्तराज छाजेड, राजाभाऊ देशमुख, अरुण पाटील,संतोष गुप्ता आदींनी यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी नायब तहसिलदार कु-हे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी का चुकीची माहिती सादर करत विश्वस्त संस्थेची पुणे येथील मोडेल कॉलनी परिसरातील तीन एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून टाकली. या जागेत शेठ हिटाचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्याथ्यांसाठी वस्तीगृह सुविधा १९६० साला पासून सुरु करण्यात आली मात्र संस्थेची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्याचे कारण विश्वस्त मंडळाने दर्शवीत राज्याचे धर्मदाय आयुक्त याच्याकडे संस्थेची संपूर्ण तीन एकर जागा विक्री करण्यासाठी परवानगी मागितली, धर्मदाय आयुक्त यानी विश्वस्त मंडळाला जागा विक्री करण्यासाठी परवानगी दिली.

संस्थेच्या ट्रस्ट नुसार संस्था चालविताना जर काही आर्थिक अडचण आल्यास विश्वस्त मंडळाने समाजाकडे दान मागणी करावी असा रक्कम उभे करण्याचा पर्याय नमूद आहेत. असे असताना विश्वस्त मंडळानी या पर्यायांचा वापर न करता व्यक्तिगत फायदा मिळवण्यासाठी संस्थेची संपूर्ण जमीन विक्री करण्याचा पर्याय स्वीकारला. संस्थेच्या इमारतीचे कुठलेही प्रकारचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता उत्कृष्ट स्थितीत असलेली इमारत चुकीच्या पद्धतीने मोडकळी दाखविण्यात आली व बोगस आदेश प्राप्त केले संस्थेच्या परिसरात १००८ श्री भगवान महावीर दिगंब जैन मंदिर जे ६५ वर्षे जुने आहे त्याचे अस्तित्वच डावलण्यात आले. संस्थेचे विरुद्ध में मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना तसेच त्याची सुनावणीची माहिती असताना जाणीवपूर्वक विश्वस्तांनी गोखले बिल्डर्स याच्याबरोबर खरेदीखत उरकून घेतली.

या सर्व प्रकारामुळे देशातील सर्व जैन बांधव अत्यंत आक्रोशीत असून हा सरळ सरळ जैन धर्मावर घाला आहे. कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता राजकीय पाठबळ व दबाव तंत्राचा वापर करीत विविध परवानगी आदेश मिळवण्यात येत आहे. या अर्जाद्वारे समस्त जैन समाज आपणाकडे मागणी करतात की तातडीने संबंधीत सर्व विभागाना निर्देश देण्यात यावे की, कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात येऊ नये तसेच सदरचा बोगस व लबाडीने बनवलेला खरेदीखत रद्द बादल करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी या मोर्चात ॲड. युनुस शेख, डॉ आनंद पारख, रमेश करवा, आनंद कासलीवाल, चंचल गंगवाल , विजय चोपडा, मदन गंगवाल ,सुशिल कासलीवाल, दिलीप सेठी, दिलीप पारख, महावीर पांडे, कैलास कासलीवाल ,मनोज काला, दिपक बडजाते ,पियुष काला, सुनिल पांडे, महेद्र आबड मुन्ना शर्मा, रमेश करवा, पवन कासलीवाल, सागर हिरे, प्रकाश शिदे, संजय लोहाचे, राजेश बडजाते, नुतन कासलीवाल तसेच महिला व पुरुष पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande