सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना -आ. सोळंके
बीड, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे असे माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. गेल्या ३३ वर्षांपासून एकही हंगाम न चुकवता कार्यक्षेत्राती
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना


बीड, 28 ऑक्टोबर, (हिं.स.) बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे असे माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

गेल्या ३३ वर्षांपासून एकही हंगाम न चुकवता कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या बळावर हा कारखाना यशस्वीरित्या चालत आला आहे. आज लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त गव्हाण पूजन कार्यक्रम ह.भ.प. महंत श्री शिवाजी महाराज (नारायणगड) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

हा कारखाना म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची आणि हक्कांची मजबूत भिंत आहे हे पुन्हा एकदा नमूद करण्यात आले. शेतकरी बागायतदार बनावा आणि ऊस उत्पादन वाढावे यासाठी सिंचन सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला.

जायकवाडी टप्पा २ अंतर्गत पैठण उजवा कालवा पुनर्स्थापित करून माजलगाव जलाशय भरून येण्याचा मार्ग मोकळा केला. या कामासाठी तब्बल ५३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. तसेच वडवणी तालुक्यासाठी साळिंबा ठिबक उपसा सिंचन योजना मंजूर करून तिथला सिंचन प्रश्न सुटण्यास हातभार लागला. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अधिक आर्थिक सक्षम बनेल.कारखान्याचा कणा म्हणजे कर्मचारीवर्ग. त्यांच्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून १०% पगारवाढ जाहीर करण्यात आली.प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यात गाळपासाठी आणावा असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande