सोलापूरमध्ये आंबा शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन
सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहव्यित महाराष्ट्र अॅग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट). प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र विकास महामंडळ पुणे, कृषि विभाग व प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर
सोलापूरमध्ये आंबा शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन


सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहव्यित महाराष्ट्र अॅग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट). प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र विकास महामंडळ पुणे, कृषि विभाग व प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर, यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित आंबा उत्तम कृषि पध्दती (GAP) प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वा. डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले आहे.

जिल्हयातील आंबा उत्पादक शेतक-यांना प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणात मध्ये प्रमुख्य मार्गदर्शक डॉ. भगावन कापसे (निर्याक्षम आंवा लागवड व काढणीपश्चात तंत्रज्ञान) व हेमंत जगताप (आंबा प्रक्रिया उदयोग), डॉ. निलेश मोरे केबी एक्सपोर्ट फलटण (आंबा निर्यात कृषि पध्दती), दिपमाला खनके मॅग्नेट प्रकल्प ( लिंग समानता व सामाजिक समावेशक) तसेच प्रगतशील शेतकरी वासुदेव गायकवाड चळे पंढरपूर (केसर आंबा प्रक्रिया व विक्री व्यवस्था) यांचे मार्गदर्शन होणार आहे.

जिल्हयातील इच्छुक शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील बीटीएम व ओटीएम आत्मा कर्मचा-याकडे नाव नोंदणी करावे. महिला शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल, असे डॉ. के बी खोत प्रकल्प संचालक, आत्मा सोलापूर वतीने आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande