प्लास्टिक वापरावर परभणी मनपाची कारवाई; किसान मॉलला पाच हजारांचा दंड
परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत वसमत रोडवरील किसान मॉल येथे बंदी असलेले प्लास्टिक कॅरीबॅग वापरात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली असून, संबंधित आस्थापनेस प्रथम दंड म्ह
बंदी असलेल्या प्लास्टिक वापरावर मनपाची कारवाई – किसान मॉलला पाच हजारांचा दंड


परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत वसमत रोडवरील किसान मॉल येथे बंदी असलेले प्लास्टिक कॅरीबॅग वापरात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली असून, संबंधित आस्थापनेस प्रथम दंड म्हणून पाच हजार रुपये आकारण्यात आले आहेत.

ही कारवाई मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, अब्दुल शादाब, सौरभ जोगदंड, शशी लहाने तसेच मनपा कर्मचारी यांच्या पथकाने केली.

महानगरपालिकेकडून अशी तपासणी व कारवाई सर्व तीन प्रभाग समिती क्षेत्रात नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा, अन्यथा नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande