परभणी - विजेच्या धक्क्याने नगर परिषद कर्मचार्‍याचा मृत्यू
परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहरातील पाळोदी रोड परिसरात सकाळी नगर परिषद सफाई कर्मचारी प्रदीप रामभाऊ सोनटक्के (वय 39) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. प्रदीप सोनटक्के, सहकारी सिद्धांत घुगे, लाखनसिंग जुन्नी व दत्ता उन्हाळे यांच्यासह
परभणी - विजेच्या धक्क्याने नगर परिषद कर्मचार्‍याचा मृत्यू


परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहरातील पाळोदी रोड परिसरात सकाळी नगर परिषद सफाई कर्मचारी प्रदीप रामभाऊ सोनटक्के (वय 39) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

प्रदीप सोनटक्के, सहकारी सिद्धांत घुगे, लाखनसिंग जुन्नी व दत्ता उन्हाळे यांच्यासह स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी डीपी बंद करण्यात आली होती. पहिल्या दोन पोलवरील कामानंतर तिसर्‍या पोलवर काम करताना त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली पडले. सहकार्‍यांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी मानवत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande