
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड शहर हे आज राज्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक हब बनले असून, राज्यातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. याचा उल्लेख गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी केला.
विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या गरजा ओळखून तरुण उद्योजक शुभम बेदमूथा यांनी “वॉशमार्ट लॉंड्री” ही अत्याधुनिक धुलाई सेवा नांदेडमध्ये सुरू केली आहे. नांदेड येथील गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना राजश्री हेमंत पाटील म्हणाल्या की, या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना ड्रायक्लीनचे कपडे,कारपेट,साड्या धुणे वाळवणे आणि इस्त्री करण्याची आधुनिक, स्वच्छ आणि वेळेवर सुविधा मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी जलद सेवा हे “वॉशमार्ट”चे मुख्य आकर्षण आहे.
या शुभारंभ प्रसंगी महावीर बेदमुथा, सौरभ बेदमुथा, महेंद्र जैन, मनीषजी वडजे, शांतीलाल जैन यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis