पिं. चिं. महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त
पिंपरी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापाल
पिं. चिं. महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त


पिंपरी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ,ब,क,ड,इ,फ,ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ,ब,क,ड,इ,फ,ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ५,१३,३,१०,६,१०,२ आणि १९ अशा एकूण ६८ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूक कोंडी,अरुंद रस्ते,अवैद्य पद्धतीने लावलेले बॅनर,लहान मुलांसाठी खेळांचे मैदान,मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त,राष्ट्रीय महामार्गावर सणासुदीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी,प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छताआदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande