सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी
सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। कार्तिकवारी यात्रा कालावधीत पंढरपूर व अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी


सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। कार्तिकवारी यात्रा कालावधीत पंढरपूर व अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार, जिल्हा प्रशासनाने संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर व श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांभोवती ड्रोन उडविण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. ही बंदी २७ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील ६० दिवस लागू राहणार आहे.

यात्रा कालावधीत दहशतवादी संघटनांकडून स्लीपर सेल सक्रीय होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवाना धारक व चालकांनी त्यांच्या ताब्यातील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande