
सोलापूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.) शहरातील प्रतिष्ठित सामाजिक संस्था श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाची ८७ वी वार्षिक सामान्य सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली.
या निवडीत अध्यक्षपदी श्री मुकेशभाई मेहता तर सचिवपदी श्री जयेशभाई पटेल यांची फेरनिवड करण्यात आली. संस्थेतील सलग ८७ वर्षांपासून चालत आलेली विना निवडणूक एकमताने पदाधिकारी निवडीची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली आहे —
• उपाध्यक्ष : श्री मणिकांतभाई दंड
• सहसचिव : श्री संदीप जव्हेरी
• खजिनदार : श्री चिमणभाई पटेल
ट्रस्टी : सर्वश्री बिपिनभाई पटेल, केशवजीभाई राम्भीया, विजयभाई पटेल आणि रमेशभाई गोरडिया
दवाखाना समिती चेअरमन : श्री कौशिक शाह
अतिथीगृह चेअरमन : श्री कांतीभाई पटेल
वाचनालय चेअरपर्सन : श्रीमती स्वातीबेन देसाई
संचालक मंडळ :
श्रीमती मीरा देसाई, श्री जगदीश पटेल, श्री संजय शाह, श्री संजय पी. पटेल, श्री मनीष राम्भीया, श्री निलेश पटेल, श्री हितेंद्र वोरा, श्री राजेश देढिया, श्री जितेंद्र पटेल, श्री मितेश पंचमिया, श्री अमित पटेल, श्री अतुल पटेल, श्री अनिल पटेल, श्री खुशाल देढिया, श्री धीरेंन गडा, श्री मेहुल पटेल, श्री धर्मेश राडिया, श्रीमती हसुमतीबेन पटेल आणि श्रीमती अरुणाबेन शाह.
संस्थेच्या सदस्यांनी निवडलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड