परभणीत ‘वॉक फॉर युनिटी’ रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या साजर्‍या होणार्‍या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून परभणी जिल्हा पोलीस दल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरात ‘वॉक फॉर युनिटी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्य
परभणीत ‘वॉक फॉर युनिटी’ रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या साजर्‍या होणार्‍या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून परभणी जिल्हा पोलीस दल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरात ‘वॉक फॉर युनिटी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, विद्यापीठाचे कुलगुरू व इतर मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते हिरव्या झेंड्याने रॅलीला सुरुवात करण्यात आली. शेतकरी भवन येथून सुरू झालेली ही पाच किलोमीटरची वॉक फॉर युनिटी रॅली पुन्हा त्याच ठिकाणी येऊन संपन्न झाली. वॉकपूर्वी सुरज सूर्यवंशी यांनी सहभागींसाठी झुंबा व वॉर्म-अप सत्र घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी एनर्जी ड्रिंक व केळीची व्यवस्था करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande