
बीड, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आंबेडकरी संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले. तसेच दोषी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपीची एस आय टी गठीत करुन चौकशी करुन आरोपी ला फाशी द्या .फलटण ऐवजी हि केस बीड जिल्ह्यात दाखल करुन फास्ट्रॅक कोर्टात चालवावी.डॅा.संपदाच्या आई वडिलांना शासनाने दहा कोटीची आर्थिक मदत द्यावी.मयत डॅा.संपदा यांच्या घरची परिस्थिती ही अतिशय हलाखीची होती यामुळे मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis