
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत दि. 2 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये जिल्ह्यात तालुकानिहाय विविध शहर व ग्रामीण भागात प्रत्यक्षपणे नागरिकापर्यंत जाऊन भ्रष्टाचार निर्मूलन संबंधाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धा कार्यक्रम, चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान भ्रष्टाचार संबंधी काही तक्रार असल्यास, तक्रार कशी करावी याबाबतची माहिती जिल्हृयातील विविध शहरी व ग्रामीण भागातील लोकापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घोषवाक्य असलेली भ्रष्टाचार निर्मूलनाची पत्रके, पॉम्पलेट, भितीपत्रके, बॅनर तयार करण्यात आले असून या माध्यमातून दि 2 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहात कार्यालयाने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रत्येक दिवशी नागरिकांपर्यंत पोहोचून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात येत आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे व अटींचे काटेकोर पालन करुन दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.
भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्श्न ब्युरो, नांदेड (मो. 9545531234/ 9226484699), विकास घनवट, पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली (मो. 9822259932) व टोल फ्री क्र. 1064, दूरध्वनी क्रमांक 02456-223055 आणि व्हॉट्सअप क्र. 9359128889 / 9422061064) यांना संपर्क साधता येईल, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis