
लातूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। रेणापूर तालुक्यातील मौजे फरदपूर येथील काँग्रेसचे माजी सरपंच कुंडलिक मदने, सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्ता मदने यांच्यासह अनेकांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
लातूर ग्रामीण मतदार संघात आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामांना प्रेरित होऊन विविध गावचे अनेकजण भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत आहेत. लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपाचे मंडल अध्यक्ष शरद दरेकर, महेंद्र गोडभरले, ओबीसी मोर्चाचे मंडल अध्यक्ष फरदपूरचे सरपंच बालासाहेब राठोड, भाजपाचे श्रीमंत नागरगोजे, प्रकाश जाधव, दीपक पवार, अजित पाटील, नरेश चपटे, फुलचंद पवार, भास्कर लहाने, संजय डोंगरे, प्रकाश राठोड यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत फरदपूर येथील माजी सरपंच कुंडलीक सुखदेव मदने, व्हाईस चेअरमन दत्ता बाजीराव मदने, ग्रामपंचायत सदस्य कस्तुरबाई मोहन फोलाने, संगीता राजाभाऊ मदने, गोविंद राठोड, सोसायटीचे संचालक गणपत पडुळकर यांच्यासह आप्पाराव देवकते, हरिभाऊ मदने, महादेव देवकते, श्रीहरी मदने, मुरलीधर मदने, उत्तम मदने, मोहन फोलाने, विष्णू पडळकर, राजाभाऊ अमनावार, ज्ञानदेव मदने, गोविंद राठोड, मीना देवकते, वर्षां मदने, लक्ष्मी मदने, महानंदा देवकते, शामल देवकते, सुमित्रा मदने, महानंदा मदने, उषा मदने, विजयमाला मदने, मोतीराम मदने यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis