सेंद्रिय नावाखाली भलत्याच मालाची खपवाखपवी चालणार नाही!
केंद्र शासनाची समिती करणार प्रमाणपत्रांची तपासणी अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : देशात व राज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती वाढत असताना सेंद्रिय नावाखाली असेंद्रिय उत्पादनांची विक्री वाढली आहे. यामुळे खऱ्या सेंद्रिय शेतकऱ्यांसह ग्राहकांचीही फसवणूक
सेंद्रिय नावाखाली भलत्याच मालाची खपवाखपवी आता चालणार नाही!  केंद्र शासनाची समिती करणार प्रमाणपत्रांची तपासणी


केंद्र शासनाची समिती करणार प्रमाणपत्रांची तपासणी

अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : देशात व राज्यात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती वाढत असताना सेंद्रिय नावाखाली असेंद्रिय उत्पादनांची विक्री वाढली आहे. यामुळे खऱ्या सेंद्रिय शेतकऱ्यांसह ग्राहकांचीही फसवणूक होत आहे. या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने प्रमाणित संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची कसून तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कृषी विभाग आता कामाला लागला आहे. बाजारात 'ऑर्गेनिक किंवा नैसर्गिक' अशा टॅगखाली अनेक उत्पादने विकली जातात, परंतु ती प्रत्यक्षात उत्पादने असेंद्रिय असतात.ग्राहकांनी लेबलवरील केंद्र प्रमाणित संस्थेचा लोगो आणि प्रमाणपत्र क्रमांक तपासणे आवश्यक आहे. यावरून सत्यता पडताळू शकता.केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्था शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र देतात. मात्र, काही ठिकाणी खोट्या प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक प्रमाणपत्र समितीमार्फत तपासले जाणार आहे.सेंद्रिय उत्पादनांचे दर साधारण उत्पादनांपेक्षा जास्त असल्याने व्यापाऱ्यांकडून या नावाखाली नफा मिळवण्यासाठी ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. चुकीचे उत्पादन खरेदी केल्याने संबंधित कुटुंबाचे आरोग्यसुध्दा धोक्याची येण्याची शक्यता असते, त्यामुळे शासन जागृत झाले आहे.

सेंद्रिय व नैसर्गिक शेतकऱ्यांचीही फसवणूकसेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने बाजारात खोटी सेंद्रिय उत्पादने आल्याने प्रतिष्ठा घालवली जाते. त्यामुळे त्यांचा माल विकला जात नाही आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.अनेक ठिकाणी एकाच प्रमाणपत्राची छायांकित प्रती वापरून बाजारात असेंद्रिय माल सेंद्रिय म्हणून विकला जातो. या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने विशेष पथक नेमले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande