आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी, - हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।स्थानिक तरुणांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारे आहे,असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल महामहिमहरिभाऊ (नाना) बागडे यांनी केले सावित्
आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी


छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।स्थानिक तरुणांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारे आहे,असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल महामहिमहरिभाऊ (नाना) बागडे यांनी केले

सावित्रीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे आकाश पदमने यांच्या ‘साई क्रिएशन’ व ‘स्वामी सीएनसी’ या व्यवसायाचा उद्घाटन सोहळा राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ (नाना) बागडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यावेळी उपस्थित होत्या. स्थानिक तरुणांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारे आहे. श्री.आकाश पदमने यांना व्यवसायाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी किसन दहीहांडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रीराम शेळके, राजू शिंदे, रामु शेळके, गणेश दहीहांडे, मदन नवपुते, सजन नाना मते, भावराव मुळे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande