
पुणे, 28 ऑक्टोबर (हिं.स.)छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, विश्वाला शांती आणि संयमाचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर सर्वांनी संकल्प करावा की, सर्वांना सामावून घेणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. याची पताका जगात उंचावण्यासाठी आणि भारत देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने योगदान द्यावे असे आवाहन अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजुदास महाराज यांनी केले.
उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये सूर्याची उपासना करून छटपुजेचे व्रत मोठ्या भक्तीभावाने केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी सनातन काळापासूनची धारणा आहे असेही महंत श्री राजुदास महाराज यांनी सांगितले.
गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने संस्थापक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर सोमवारी छटपूजा श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
-------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु