
रत्नागिरी, 28 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना भारत सरकारच्या निती आयोगाच्या मान्यतेने आशिया इंटरनॅशनल कल्चर या आंतरराष्ट्रीय अॅकॅडमीकडून डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
युयुत्सु आर्ते यांनी अनेक सामाजिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून त्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांकडून राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या ते रत्नागिरी नमन महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनात त्यांचा पुढाकार असतो. राजकीय क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे आर्ते यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
युयुत्सु आर्ते यांच्या डॉक्टरेटबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी