
सोलापूर, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. सोलापूर शहरात छोट्या-मोठ्या कारणावरुन संप, आंदोलने, निदर्शने इत्यादि होत असतात. तसेच शहरात आगामी काळात तुलसी विवाह, गुरुनानक जयंती, इत्यादी सण, उत्सव संपन्न होणार आहेत. तसेच वक्फ अध्यादेश, मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण वगैरेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश 27 ऑक्टोबर 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 10 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री 24.00 वाजेपर्यंत प्रभावी राहील, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) गौहर हसन यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड