अमरावतीत मांसविक्रीत्याना सुगीचे दिवस
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळी सुट्यांमुळे बायको माहेरी गेल्याने असंख्य पतिराज ढाबे, बारमध्ये खरी दिवाळीं साजरी करीत आहेत. बायको गावी गेल्यामुळे आपल्या मित्र परिवाराबरोबर त्यांची ओल्या पाट्यांची धूम सध्या सुरू आहे, अंजनगाव शहरातील ढाबे व बार,
बायको माहेरी पती ढाब्यावरी... दिवाळी सुट्यांत मंडळी गावी गेल्याने हॉटेलवर पतिराजांच्या ओल्या पार्ट्या... मांसविक्रीत्याना आले तीन दिवसांपासून सुगीचे दिवस


अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळी सुट्यांमुळे बायको माहेरी गेल्याने असंख्य पतिराज ढाबे, बारमध्ये खरी दिवाळीं साजरी करीत आहेत. बायको गावी गेल्यामुळे आपल्या मित्र परिवाराबरोबर त्यांची ओल्या पाट्यांची धूम सध्या सुरू आहे, अंजनगाव शहरातील ढाबे व बार, दर्यापूर रोड अकोट रोड तसेच परतवाडा रोडसह शहरालगत असलेल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल आणि ढाब्यांवर तमाम पतिराजांची गर्दी उसळली आहे. त्यात शासकीय सेवेतील कर्मचारी-अधिकारी, शिक्षक संख्या सर्वाधिक आहे.दिवाळीच्या सुट्यांमध्ये कपन्यांसह ईतर क्षेत्रातील आस्थापनांना सुट्या असल्याने महिला मुलांसह दिवाळीसाठी आपापल्या माहेरी गेल्या आहेत, वर्षातून येंणाऱ्या या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन पुरुष मंडळी आपल्या मित्र परिवार, तसेच नातेवाईका बरोबर सध्याच्या गुलाबी वातावरणात चमचमीत खाण्यासाठी शहरालगतच्या विविध मार्गावरील हॉटेलमध्ये डेरेदाखल आहेत. अंजनगाव अकोट रस्त्यावर तर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तेथील ढाबे, हॉटेल, तसेच रेस्टहाउसवर दिवसभर ओल्या पार्ट्या सुरू आहेत.निवडणूक प्रचारात सक्रिय झालेले आणि नेत्यांपासून पैसे उकळणारे हुशार कार्यकते आता दारू, मटण, माशांवर मित्रांसोबत खिसा खाली करत आहेत. नगरपरिषद पंचायत समिती व जिल्हा परिषद ला उभे राहणारे उमेदवार घरात बसून निराशेने एकेक क्षण कसा चालावयाचा या विचारात बुडालेले असताना हुशारआणि हिशोबी कार्यकर्ते उमेदवारानं प्रचारासाठी दिलेल्या पैशावर ताव मारत आहेत,

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धाबेवाल्यांची दिवाळी जोरात सुरू असून रात्री बारा-बारा पर्यंत ऑर्डर पूण करताना त्यांची पाठ मोडायची बाकी राहिली आहे, कारण शनिवार- रविवारपर्यत शासकीय सुट्टी आल्यामुळे गर्दी वाढत आहे. असे अंजनगाव सुर्जी दर्यापूर-रोडवरील एका धाबे मालकाने बोलताना सांगितले दिवाळी मुळे अनेक दिवसांपासून मांसाहार खाणे बंद होते त्यामुळे मांसाहार खाणाऱ्याची तीन दिवसांपासून गर्दी उसळली आहे त्यामुळे मांसाहार विक्री करणाऱ्यांची तीन दिवसांपासून चांगलीच व्यवसायात यशस्वी होत असल्याने मांस विक्रीत्यांना चांगलेच सुगीचे दिवस आले आहे अशी माहिती मटन विक्री त्याकडून समजली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande