
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। दिव्यांग बांधवांना केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर स्थिर रोजगार व उद्योजकतेच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती सन्मानपूर्वक आणि स्वावलंबी जीवन जगू शकेल, हा आमचा प्रयत्न आहे. असे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ६१ वी बैठक आज मंत्रालयात पार पडली.
या संदर्भात मंत्री अतुल सावे म्हणाले की,बैठकीत रोजगार आणि स्वउद्योगाशी संबंधित विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. पर्यावरणस्नेही फिरते वाहनावरील दुकान या योजनेद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. तसेच, त्यांच्या क्षमतांनुसार व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येतील.
या बैठकीस विभागाचे सचिव श्री.तुकाराम मुंढे, आयुक्त श्री.समीर कुर्तकोटी, व्यवस्थापकीय संचालक श्री.प्रकाश थविल आणि उपसचिव श्रीमती सुनंदा घड्याळे उपस्थित होते.
दिव्यांगांच्या रोजगार व स्वउद्योगासाठी शासन कटिबद्ध!
दिव्यांग बांधवांना केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर स्थिर रोजगार व उद्योजकतेच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती सन्मानपूर्वक आणि स्वावलंबी जीवन जगू शकेल, हा आमचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ६१ वी बैठक आज मंत्रालयात पार पडली.
बैठकीत रोजगार आणि स्वउद्योगाशी संबंधित विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. पर्यावरणस्नेही फिरते वाहनावरील दुकान या योजनेद्वारे दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जात आहे. तसेच, त्यांच्या क्षमतांनुसार व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येतील.
या बैठकीस विभागाचे सचिव श्री.तुकाराम मुंढे, आयुक्त श्री.समीर कुर्तकोटी, व्यवस्थापकीय संचालक श्री.प्रकाश थविल आणि उपसचिव श्रीमती सुनंदा घड्याळे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis