
लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। अहमदपूर पोलीस स्टेशनतर्फे 'एकता दौड'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्या वतीने दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता 'एकतेसाठी धावा' (एकता दौड) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संदेश जनमानसात पोहोचवणे हा या दौडचा मुख्य उद्देश आहे.
'एकता दौड'ची सुरुवात आणि समाप्ती पोलीस स्टेशन अहमदपूर येथे होईल. दौडचा मार्ग खालीलप्रमाणे असेल पोलीस स्टेशन अहमदपूर येथून सुरू होऊन ही दौड डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वि.दा. सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक - एम.जी. कॉलेज, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पुन्हा एम. जी. कॉलेज येथे येईल. त्यानंतर पुन्हा महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, पोस्ट लाईन मार्गे परत पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दौडची सांगता होईल सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी जे अमूल्य कार्य केले, त्याचे स्मरण यानिमित्ताने केले जाईल. अहमदपूर शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, विविध संस्थांचे सदस्य आणि युवकांनी मोठ्या संख्येने या 'एकता दौड' मध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक बळकट करावा. ही दौड शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सुरू होईल. सर्व देशप्रेमी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन रायबोले यांनी केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis