नंदुरबारमध्ये ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ विशेष उपक्रमांचे आयोजन
नंदुरबार, 29 ऑक्टोबर (हिं.स.) छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली 12 दुर्गांना नुकताच युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून दर्जा बहाल केला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, शासनाच्या ‘अमृत’ या संस्थेच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या विशेष
नंदुरबारमध्ये ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ विशेष उपक्रमांचे आयोजन


नंदुरबार, 29 ऑक्टोबर (हिं.स.) छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली 12 दुर्गांना नुकताच युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून दर्जा बहाल केला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, शासनाच्या ‘अमृत’ या संस्थेच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचे जिल्हा व्यवस्थापक योगेश

अहिरे यांनी केले आहे.

राज्यात किल्ले बनवण्याची पारंपरिक पद्धत रुजलेली आहे. याच प्रथेला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी ‘अमृत’ने हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात मान्यता दिली आहे.

या उपक्रमात

 नागरिकांनी आपापल्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा सोसायटीमध्ये युनेस्कोने घोषित केलेल्या

12 शिवकालीन दुर्गांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती साकारायची आहे.

 प्रतिकृती तयार झाल्यावर, त्यासोबत आपला एक सेल्फी किंवा फोटो काढून तो

www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे.

 या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे

‘अभिनंदन पत्र’ प्राप्त होणार आहे.

जागतिक वारसा ठरलेले 12 किल्ले

रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पन्हाळगड, लोहगड, पद्मदुर्ग, जिंजी, साल्हेर, विजयदुर्ग,

आणि खांदेरी.

“ही केवळ स्पर्धा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा आणि आपला संस्कृतीचा

अभिमान आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने

या उत्सवात सक्रिय सहभाग घेऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे”.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande