एकता दौड – Run For Unity कार्यक्रमासाठी भाजपा परभणी महानगरची बैठक संपन्न
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यभर साजऱ्या होणाऱ्या ‘एकता दौड – Run For Unity’ या भव्य उपक्रमाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आज परभणी येथे पार पड
एकता दौड – Run For Unity’ कार्यक्रमासाठी भाजपा परभणी महानगरची बैठक संपन्न


परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यभर साजऱ्या होणाऱ्या ‘एकता दौड – Run For Unity’ या भव्य उपक्रमाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आज परभणी येथे पार पडली.

ही बैठक भाजपा परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, विविध मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होणाऱ्या ‘एकता दौड’ कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन करण्यात आले. ही दौड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पार्क, परभणी या मार्गावर पार पडणार असून, कार्यक्रमाच्या तयारीची रूपरेषा, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांवर विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे म्हणाले, “सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकीकरण करून राष्ट्रीय एकतेचे अद्वितीय उदाहरण निर्माण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त ‘Run For Unity’ ही दौड ही त्यांच्या कार्याला दिलेली खरी आदरांजली ठरेल. परभणीतील सर्व नागरिकांनी, विशेषतः युवक व महिलांनी या दौडीत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.”

भाजपच्या वतीने परभणीतील सर्व नागरिकांना या ‘एकता दौड’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमातून “राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश” दृढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande