लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकार - दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्याभरात प्रत्येक कार्यालयात लोकसेवकांचे व नागरिकांचे प्रबोधन करावे, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लोकसेवकांनी लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा, असे
लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकार


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्याभरात प्रत्येक कार्यालयात लोकसेवकांचे व नागरिकांचे प्रबोधन करावे, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लोकसेवकांनी लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, संगिता राठोड, संगिता सानप तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दक्षता जनजागृती सप्ताह सध्या राबविण्यात येत आहे. यानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात ॲन्टीकरप्शन ब्युरोच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले की, एखाद्या लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे.त्यासाठी त्यांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ७७२०८९१०६४ या व्हॉट्सअप क्रमांकावरही संपर्क साधू शकता.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची माहिती द्यावी. आपल्या कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनाही ही माहिती द्यावी. त्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहानिमित्त करावे,असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये, तहसिल कार्यालये, गटविकास अधिकारी आदी दुरदृष्यप्रणालीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande