नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस समितीची बैठक
नांदेड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक संदर्भात महत्वाची आढावा बैठक नांदेड येथे संपन्न झाली.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नवा मोंढा काँग्रेस पक्
अ


नांदेड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूक संदर्भात महत्वाची आढावा बैठक नांदेड येथे संपन्न झाली.प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नवा मोंढा काँग्रेस पक्ष कार्यालय येथे पार पडली.

या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या असा सूर या बैठकीत निघाला. यावेळी माजी पदवीधर मराठवाडा समन्वयक अनिल अहेमद, खा. रविंद्र पा. चव्हाण, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष मसुद अहमद खान, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, जिल्हाध्यक्ष हणमंतराव पा. बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, मा. आ. माधवराव पा. जवळगावकर, श्रावण रॅपनवाड, अजीज कुरेशी आदीसह काँग्रेस पदाधिकारी व माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande