
नांदेड, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील गलूर येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आपली लढाई सत्याची लढाई आहे.
कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करत त्यांनी आवाहन केले की, “येणाऱ्या निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत सत्याचा विजय सुनिश्चित करावा.”
यावेळी नांदेड जिल्ह्यातील आणि देगलूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis