अजित पवार गुरुवारी लातूरच्या दौऱ्यावर
उदगीर मध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा कार्यक्रम


लातूर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

नांदेड येथून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे सायंकाळी ७ वाजता उदगीर येथे आगमन होईल. याठिकाणी त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण व अभिवादन होईल. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता उदगीर येथील दसरा मैदान, तालुका क्रिडा संकुल (जिल्हा परिषद मैदान) येथे त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होईल. रात्री ९ वाजता उदगीर येथील उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटल येथे नेत्र रुग्ण धर्मशाळा व दंत चिकित्सा रूग्णालय लोकार्पण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. रात्री ९.१५ वाजता नांदेड रोडवरील लोणी येथील उदयगिरी औद्योगिक वसाहत येथे आगमन होईल व राखीव. रात्री १० वाजता नांदेडकडे प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande