छ.संभाजीनगर: सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद्धतीने पदभरती
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे विविध अशासकीय पदांवर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे,असे सैनिक सेवापूव प्रशिक्षण संस्थेचे संचालक निवृत्त कर्नल मकरंद देशमुख
छ.संभाजीनगर: सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद्धतीने पदभरती


छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे विविध अशासकीय पदांवर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे,असे सैनिक सेवापूव प्रशिक्षण संस्थेचे संचालक निवृत्त कर्नल मकरंद देशमुख यांनी कळविले आहे.

या भरतीत भरावयाची पदे सुतार, शिपाई, ग्राऊंडमॅन, मसालची, सफाईगार, वाहनचालक, डिटीपी ऑपरेटर, व सहायक लिपिक या पदासाठी भरती होणारी पदसंख्या प्रत्येकी एक (१) आहे.

सुतार, शिपाई, ग्राऊंडस्मॅन, मसालची, सफाईगार, वाहन चालक यापदांसाठीचे उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण असावे. तसेच माजी सैनिक व इतर नागरिक अर्ज करू शकतात. वाहनचालक पदासाठी कार्यालयीन कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तर डीटीपी ऑपरेटर या पदासाठी इयत्ता १२ वी पास उमेदवार व मराठी , इंग्रजी भाषेचे टायपिंग ज्ञान आवश्यक आहे. सहायक लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर ही पात्रता असून संगणक हाताळणीचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य राहील.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, एन–१२, सेक्टर–सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक कर्नल (निवृत्त) मकरंद देशमुख यांनी केले आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ९७६७१५०४७७/ ९४२३२५३६६८.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande