बच्चू कडू च्या आंदोलनाला नाशिक मधील शेतकऱ्यांचा पाठिंबा
नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनास नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलकांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज भगवान बोराडे दिलीप पाटील हे नागपूरकडे रवाना झाले असून बाकीचे कार्यकर्ते लवकरच नाशिक जिल्ह्यातून शेकडो
बच्चू कडू च्या आंदोलनाला नाशिक मधील शेतकऱ्यांच्या पाठिंबा


नाशिक, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनास नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलकांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज भगवान बोराडे दिलीप पाटील हे नागपूरकडे रवाना झाले असून बाकीचे कार्यकर्ते लवकरच नाशिक जिल्ह्यातून शेकडो जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी नागपूरकडे रवाना होणार आहेत अशी माहिती शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, 938 आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील यांनी दिले.

बच्चू कडू यांना पाठिंब्याचे पत्र घेऊन भगवान बोराडे व दिलीप पाटील काही कार्यकर्त्यांसह नागपूरकडे रवाना झाले आहेत . पत्रामध्ये आम्ही नाशिक येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 881 दिवसापासून एक जून 2023 पासून धरणे आंदोलन करीत आहोत शासनाकडे अनेक वेळा अर्ज विनंती करू नये शासन मात्र त्याची दखल घेत नाही बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा असून आम्ही सर्व थकबाकीदार शेतकरी व अवकाळी पावसाच्या नुकसानी झालेले शेतकरी नाशिकहून नागपूर जाऊन आंदोलनात सहभागी होणार आहोत असे त्यांनी सांगितले असे सांगितले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची शक्तीची कर्ज वसुली व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ( सिव्हील हॉस्पिटल) समोर धरणे आंदोलन सुरू आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande