रायगड-हेक्टरी नव्हे तर गुंठ्यांप्रमाणे नुकसान भरपाईची देण्याची मागणी
रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)रायगड जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती गुंठा ५,००० रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी नेते ऍड. राकेश पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्व
रायगड जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती गुंठा ५,००० रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी नेते अॅड. राकेश पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, “मी व्यवसायाने वकील असलो तरी पहिल्यांदा शेतकरी आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, सुधागड आणि तळा या १५ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे भात पिक पावसामुळे पूर्णतः नष्ट झाले आहे.”  रायगडातील शेती ही डोंगर-दऱ्यांमध्ये व समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने येथे शेतकऱ्यांकडे केवळ १० ते १५ गुंठ्यांचीच जमीन आहे. या जमिनींचा बाजारभाव सरासरी गुंठ्याला २ ते ३ लाख रुपये असून, या क्षेत्रातून सरकारला मुद्रांक शुल्काद्वारे कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तरीदेखील नुकसानभरपाई “हेक्टरी” निकषाने देणे अन्यायकारक ठरेल, असे पाटील यांनी नमूद केले आहे.  त्यांनी पुढे म्हटले की, “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीच आपली जमीन देऊन MIDC, CIDCO, JSW, सुदर्शन, गेल, JNPT यांसारख्या उद्योगांना उभे केले. त्यामुळे या कंपन्यांचीही नैतिक जबाबदारी शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे.”  शेतकऱ्यांचा जीव आधार असलेल्या भात शेतीचा संपूर्ण नाश झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने प्रती गुंठा ५,००० रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्यांचा कणा ताठ करावा, अशी मागणी अॅड. राकेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


रायगड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)रायगड जिल्ह्यात अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती गुंठा ५,००० रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी नेते ऍड. राकेश पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, “मी व्यवसायाने वकील असलो तरी पहिल्यांदा शेतकरी आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, सुधागड आणि तळा या १५ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे भात पिक पावसामुळे पूर्णतः नष्ट झाले आहे.”रायगडातील शेती ही डोंगर-दऱ्यांमध्ये व समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने येथे शेतकऱ्यांकडे केवळ १० ते १५ गुंठ्यांचीच जमीन आहे. या जमिनींचा बाजारभाव सरासरी गुंठ्याला २ ते ३ लाख रुपये असून, या क्षेत्रातून सरकारला मुद्रांक शुल्काद्वारे कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तरीदेखील नुकसानभरपाई “हेक्टरी” निकषाने देणे अन्यायकारक ठरेल, असे पाटील यांनी नमूद केले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीच आपली जमीन देऊन MIDC, CIDCO, JSW, सुदर्शन, गेल, JNPT यांसारख्या उद्योगांना उभे केले. त्यामुळे या कंपन्यांचीही नैतिक जबाबदारी शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे.” शेतकऱ्यांचा जीव आधार असलेल्या भात शेतीचा संपूर्ण नाश झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने प्रती गुंठा ५,००० रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्यांचा कणा ताठ करावा, अशी मागणी ऍड. राकेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande