
परभणी, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील माखणी व पिंपळदरी या दोन महसूल मंडळात गेल्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. माखणीत 65.5 तर पिंपळदरीत 66 मिली मीटर एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली.
गेल्या काही तासांपासून संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण पूर्णतः बदलले आहे. विशेषतः शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यात पावसाचा अधिक जोर होता. सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. परभणी शहरात सकाळी रिमझिम असा पाऊस झाला. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.
दरम्यान, हवामानातील या बदलामुळे व पावसामुळे सर्वसामान्य नागरीक अक्षरशः हतबल झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis