कापूस किसान मोबाईल अॅप सुरू
जळगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय कपास महामंडळ, नवी मुंबई यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘कापूस किसान मोबाईल अॅप’ हे नवे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. हे अॅप कापूस हंगामात २४ तास व ७ दिवस उपलब्ध राहणार असून, शेतकऱ्यांना नोंदणी तसे
कापूस किसान मोबाईल अॅप सुरू


जळगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय कपास महामंडळ, नवी मुंबई यांनी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘कापूस किसान मोबाईल अॅप’ हे नवे मोबाईल

अॅप्लिकेशन सुरू केले आहे. हे अॅप कापूस हंगामात २४ तास व ७ दिवस उपलब्ध राहणार असून,

शेतकऱ्यांना नोंदणी तसेच स्लॉट बुकिंग प्रक्रियेसाठी मोठी मदत करणार आहे.

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी नोंदणी व स्लॉट बुकिंग प्रक्रियेबाबत अधिक माहिती व व्हिडिओ

यासाठी, https://www.youtube.com/@KapasKisan-Official या लिंकवर सविस्तर माहिती

उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्लॉट बुकिंग प्रक्रिया ७ दिवसांच्या रोलिंग बेसिसवर खुली राहील. प्रत्येक दिवशी एक तारीख बंद

होईल व पुढील दिवशी नवीन तारीख खुली केली जाईल. उद्घाटनाच्या दिवशी सुट्टी राहणार नाही.

महाराष्ट्र राज्याकरिता स्लॉट बुकिंग वेळ, दररोज अकोला शाखा, सकाळी १० पासून, औरंगाबाद

शाखा, सकाळी १० पासून ठरविण्यात आल्या आहेत .

सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कपास महामंडळाद्वारे आवाहन करण्यात आले आहे की

त्यांनी कापूस किसान मोबाईल अॅपवर आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, तसेच

सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकिंग करणे आवश्यक आहे, असे

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक, जळगाव यांनी

प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande