परभणीत तंबाखू मुक्त युवा अभियान राबवू — जिल्हाधिकारी
परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्
तंबाखू मुक्त युवा अभियान राबवूया — जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन


परभणी, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक सामान्य रुग्णालय परभणी येथे पार पडली. या बैठकीस डॉ. नागेश लखमावार, जिल्हा शल्यचिकित्सक व सदस्य सचिव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग तसेच चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक आदी अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सर्व विभाग प्रमुखांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची माहिती व कोटपा (COTPA) कायद्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. राज्यस्तरावरून सुरु करण्यात आलेल्या “तंबाखू मुक्त युवा अभियान” या ६० दिवसांच्या उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानाअंतर्गत अधिकाधिक शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त घोषित करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बैठकीदरम्यान निर्देश दिले की, जिल्ह्यात कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग व तंबाखू नियंत्रण कक्ष यांनी शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरातील पानटपरी चालकांना सूचना देऊन आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी. तसेच सर्व शासकीय कार्यालये व विभाग प्रमुखांनी आपापल्या कार्यक्षेत्रात तंबाखू, गुटखा सेवन व धूम्रपानावर बंदी घालावी आणि उल्लंघन करणाऱ्यांवर २०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी किमान ३० गावे तंबाखू मुक्त घोषित करण्याचे लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिले. तंबाखूमुक्त परभणीसाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करत “तंबाखू मुक्त युवा अभियान” प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande