
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन एकजुटीने लढण्याचा निर्धार करकंब येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या विचार विनिमय बैठकीत करण्यात आला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, अनिल सावंत, सुनंजय पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड