माजलगाव शहरात महायुतीला वेगळे लढण्याची भूमिका पडू शकते महागात
बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीचे संकेत दिसुन येत आहेत. कारण तिन्ही पक्षाने माजलगाव शहरात वेगवेगळ्या बैठका घेत
माजलगाव शहरात महायुतीला वेगळे लढण्याची भूमिका पडू शकते महागात


बीड, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीचे संकेत दिसुन येत आहेत.

कारण तिन्ही पक्षाने माजलगाव शहरात वेगवेगळ्या बैठका घेतल्या असुन भाजपाचे तर स्वतंत्र लढण्यावर एकमत देखिल झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी आणखी काय बदल होणार? तसेच महायुतीतील तिनही पक्षाने वेगळे लढण्याची भूमिका राजकीय युती न झाल्यास माजलगावात तिन्ही पक्षांना निवडणुकीतील विजयासाठी करावी लागणार कसरत करावी लागणार आहे.

त्यामुळे महायुतीला वेगळे लढण्याची भूमिका महागात पडू शकते तर युती न झाल्यास माजलगावात तिन्ही पक्षांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चीत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखिल हीच परिस्थिती राहण्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक मतदान आमदार सोळंके यांना पडले परंतु स्थानिक स्तरावर कणखर नेतृत्व नसल्याने मात्र भाजपाच्या असलेल्या मतदारांचा कौल कोणाकडे जाणार हा प्रश्न आहे. माजलगाव शहरात भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा मोठा वर्ग आहे. आमदार प्रकाश सोळंके यांचेसारखे नेतृत्व असल्याने मात्र पक्षाची बळकटी वाढलेली आहे.

सोशल मिडीया तसेच दिवाळी फराळाचे वाटपासह मतदारांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत मतदारांना साद घातली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराज्यामध्ये सत्तारूढ असलेल्या महायुती सरकारच्या समीकरणाची जागा राष्ट्र‌वादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना सोडण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्र‌वादी, भाजपा व शिवसेनेच्या मतदारांनी आमदार प्रकाश सोळंके यांना मतदान करत विजयी केले. परंतु याचा परिणाम भाजपा पक्षाच्या मतदारांवर झाला तर ऐनवेळी भाजपात असलेल्या रमेश आडसकरांनी देखिल पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणुक लढविली तर मोहन जगताप यांनी देखिल शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला .परिणामी मतदारसंघात भाजपाला कणखर नेतृत्व राहिले नाही. असे असतांनाही भाजपाने केलेल्या शहरामध्ये राष्ट्र‌वादीचे मतदान आमदार सोळंके यांना कमी झाले होते.

भाजपा पक्षावर प्रेम करणारा सर्वाधिक वर्ग शहरामध्ये आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा उमेदवार नक्की निवडुन येईल परंतु स्वतंत्र लढल्यास पक्षनिहाय मतदान तसेच मतांचे विभाजन होवुन मात्र महायुतीमधील तिनही मित्रपक्ष मात्र अडचणीत येतील असे चित्र सध्यातरी राजकीय वर्तुळात दिसुन येत आहे. परिणामी तिसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande