
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त शिक्षणाधिकारी श्री.एम.के.देशमुख, निवृत्त उपसंचालक श्री.भाऊसाहेब तुपे पाटील, जालना येथील माजी शिक्षणाधिकारी श्री.रमेश तांगडे पाटील, हिंगोलीचे माजी शिक्षणाधिकारी श्री.शिवाजी पवार, नांदेडचे उपशिक्षणाधिकारी श्री.व्यंकटेश कोमटवार, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री.मनोज पाटील, संस्थाचालक महामंडळाचे मराठवाडा कार्याध्यक्ष श्री.आबासाहेब जगताप, तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.शिवाजी देवरे पाटील, प्राचार्य श्री.रामलाल पंडुरे, प्राचार्य श्री.अभिलाष सोनावणे, परभणी मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.राजिवजी शिंदे, छत्रपती संभाजीनगर संस्थाचालक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री.विजय द्वारकोंडे, शिक्षक क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.विशाल सुर्यवंशी, मुख्याध्यापक महासंघ छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष श्री.धैर्यशील केरे पाटील, भैरवनाथ महाविद्यालय वैजापूरचे प्राचार्य श्री.गोरे, दुधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.आनंद खरात, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.के.एम.फसाटे, बळीराजा शिक्षण संघटना परभणीचे प्रशासकीय अधिकारी श्री.शिरसकर, सहारा शिक्षण संस्थेचे सल्लागार श्री.पद्माकर देशमुख, माउंट व्हॅली इंग्लिश स्कूल छत्रपती संभाजीनगरचे चेअरमन श्री.सदाशिव पाटील, शिवाजी महाविद्यालय परभणीचे माजी प्राचार्य श्री.शिवाजी घारुळे आणि श्री.जोशी यांचा समावेश आहे.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री श्री.अतुल सावे आमदार श्री.संजय केणेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.अनिल मकरिये उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis