उदगीरातील प्रदूषणात वाढ; एक्यूआय १७०, आवाज ११४ डेसिबलची नोंद
लातूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या मोठ्या वापरामुळे उदगीर शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी चिंताजनकरीत्या वाढल्याचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे. करण्यात आलेल्या मापनानुसार, शहराच
उदगीरातील प्रदूषणात वाढ; एक्यूआय १७०, आवाज ११४ डेसिबलची नोंद


लातूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या मोठ्या वापरामुळे उदगीर शहरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी चिंताजनकरीत्या वाढल्याचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे. करण्यात आलेल्या मापनानुसार, शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स १७० वर पोहोचला असून तो 'मध्यम-खराब' श्रेणीत मोडतो.

सर्वेक्षणानुसार, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राचा १७२, व्यापारी भागाचा १७० आणि रहिवासी परिसराचा १६९ इतका नोंदवला गेला. तज्ज्ञांच्या मते, प्रमाण १०० च्या वर गेल्यास श्वसनाचे त्रास आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. यासोबतच, शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळीही लक्षणीय वाढली. औद्योगिक भागात ११४ डेसिबलपर्यंत तर व्यापारी भागात १०० ते ११० डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मापदंडापेक्षा ही पातळी अनेक पटींनी जास्त आहे.

पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे सर्वेक्षण केले. नागरिकांनी कमी आवाज व कमी धूर निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर करणे आरोग्यासाठी हितावह आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वेक्षणानुसार उदगीर शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी १७० नोंदवली गेली, जी 'मध्यम-खराब' श्रेणीत येते. औद्योगिक भागात १७२, व्यापारी भागात १७० आणि रहिवासी परिसरात १६९ इतका होता. ध्वनी प्रदूषणात औद्योगिक भागात आवाजाची पातळी ११४ डेसिबल आणि व्यापारी भागात १०० ते ११० डेसिबलपर्यंत पोहोचली. मापदंडानुसार (रहिवासी भागः ५०-५५ डेसिबल) ही पातळी अनेक पटींनी जास्त आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande