
नांदेड, 29 ऑक्टोबर (हिं.स.) नांदेड तालुक्यातील मौजे निळा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गावकरी मंडळींच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी पारायण,भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे भक्तिमय आयोजन करण्यात आले होते. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यावेळी उपस्थित होते. या सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ह.भ.प. भागवताचार्य सोपान महाराज सानप (शास्त्री) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या दिव्य सप्ताहाचा समारोप झाला.या प्रसंगी भाविकांनी उपस्थित राहून काल्याच्या कीर्तनाचा आणि सामूहिक भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला. गावातील सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत, संत परंपरेचे आणि हरिनाम संकीर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis