
सोलापूर, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहर पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपये जागतिक बॅंकेकडून उपलब्ध करून देणे, शहरातील प्रस्तावित ९५० कोटींचे दोन उड्डाणपूल, १२५ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रकल्पातील पाणी कराराला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिल्या.
महापालिका सभागृहात सभागृहात सोमवारी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस उपायुक्त (परिमंडळ) हसन गौहर, अक्कलकोट रोड एमआयडीसीचे अधिकारी एस. टी. राठोड, अध्यक्ष तिलोकचंद बैठक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जुना पुणे नाका ते पत्रकार भवन उड्डाणपूल आणि जुना बोरामणी नाका ते मोरारजी बंगला उड्डाणपूल या दोन्ही प्रस्तावित उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी बाधित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या जागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड