
छत्रपती संभाजीनगर, 29 ऑक्टोबर (हिं.स.)।
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते अधिक मजबूत, सुरक्षित आणि सुगम व्हावेत यासाठी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत तब्बल ६ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या मंजुरीमुळे मतदारसंघातील अनेक गावांमध्ये वाहतुकीची सुविधा सुधारेल, शेतीमाल वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांना दळणवळणाचा मोठा दिलासा मिळेल.यात पुढील रस्त्यांचा कामाचा समावेश आहे.
टोनगाव ते गारखेडा नं.२ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (५० लक्ष)
मौजे डोंगरगाव शिव ते निधोना रस्त्याचे पुलासह मजबुती व डांबरीकरण करणे (५० लक्ष)
प्रजीमा-१५ ते जळगाव मेटे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (७० लक्ष )
चिंचोली बु. ते मोरहिरा इजिमा-८१ रस्ता पुल मोऱ्यासह मजबुतिकरण व डांबरीकरण करणे (९९.५८ लक्ष)
खामगाव ते उमरावती रस्त्याचे पुल मोऱ्यासह मजबुतिकरण व डांबरीकरण करणे (५० लक्ष)
ता.फुलंब्री आडगाव बु. ते बाबरा (ग्रामा-१५७) रस्त्याचे पुलासह मजबुतिकरण व डांबरीकरण करणे (५० लक्ष)
मौजे जातवा ते भागोबावाडी रस्ता मजबुतिकरण व डांबरीकरण करणे (७५.२२ लक्ष )
कानोरी ते सोटम वस्ती (ग्रामा-२८) रस्त्याचे मजबुतिकरण व डांबरीकरण करणे (५० लक्ष)वरझडी ते गेवराई कुबेर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (७५ लक्ष)
मौजे नरला ते भावडी रस्त्याचे पुलासह मजबुती व डांबरीकरण करणे (५० लक्ष)
या निर्णयामुळे फुलंब्री तालुक्याचा विकास अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis